अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती

0 1,695

वणी/विवेक तोटेवार: शहराजवळील वागदरा गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्याची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध वणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अत्याचार करणारा आरोपी देखील अल्पवयीन आहे.

सविस्तर वृत्त असे की, सीमा (बदललेले नाव) ही वणीतील एका शाळेत 9 व्या वर्गात शिक्षण घेत होती. आरोपी मंगेश (नाव बदललेले) तिला एक ते दीड वर्षांपासून ओळखत होती. ओळख असल्याने ती मंगेशसोबत बोलायची. मंगेशने तिला अनेक वेळा शारीरिक संबंध स्थापीत करण्यासाठी विचारणाही केली होती. सोबतच मंगेशने तिला लग्नाचे आमिशही दाखविले. परंतु तिने याला स्पष्ट नकार दिला.

11 नोव्हेंबर 2017 ला मंगेश सीमाची शाळा संपल्यानंतर दुपारी 11.30 च्या सुमारास घरी जात असताना शास्त्रीनगर जवळ भेटला. त्यावेळी त्याने लाल रंगाची पल्सर गाडी घेऊन आला होता. त्याने सीमाला म्हटले की आपण गाडीवर फिरून येऊ. परंतु त्याच्या या मागणीला सीमाने नकार दिला. मात्र मंगेशने बळजबरीने सीमाचा हाथ पकडून गाडीवर बसविले व मुकुडबन रोडवरील 18 नंबरच्या पुलाखाली गाडी थांबवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला.

अलिकडेच सीमाच्या आईला सीमामध्ये झालेले बदल लक्षात आले. त्यामुळे तिच्या आईने तिला वणीतील एक खाजगी रुग्णालयात उपचारासासठी नेले. तपासणी नंतर डॉक्टरांनी सीमा गर्भवती असल्याचे सांगितले. ही गोष्ट लक्षात येताच सीमाचा आई व शेजारी राहणाऱ्या महिलेने सीमाला चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखविले. तेथे सीमा ही साडेचार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. शेवटी सीमाला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शुक्रवारी दुपारी वणीत पोलिसात तक्रार देण्यात आली. आरोपी मंगेशविरुद्ध कलम 376 (2)(i ), 506, 4, 8,12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.