कुंभा येथे सात लाखांची देशी-विदेशी दारु जप्त

0 1,053

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे रविवारी पहाटे अवैधरित्या घरी साठवून ठेवलेल्या देशी विदेशी दारूच्या १६० पेट्या अंदाजे किंमत ७ लाख,६ हजार,११७ रुपये किंमतीचा मुद्देमालासह जप्त केला. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाने केली अाहे.

कुंभा येथील रहिवासी वसंत नामदेव ठाकरे यांच्या घरी अवैधरित्या विक्री करन्याच्या उद्देशाने ठेवलेली १६० पेट्या देशी विदेशी दारु गुप्त माहितीच्या आधारे नागपूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क यांनी रविवारच्या पहाटे धाड टाकुन मुद्देमालासह आरोपीला अटक केली. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा ६५(e),८१,८३ कलम अनन्वे गुन्हा दाखल केला आहे. ही तालुक्यातील मोठी कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

नागपुर विभाग राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय उपयुक्त यु.अार.वर्मा, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क एम.बी.पटवर्धन यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय निरिक्षक  ए.आर कैकाडे, दुय्यम निरीक्षक गजानन वाकोडे, राहुल सपकाळ, आर.व्ही.कावटे यांचे सहकार्याने कारवाई करन्यात आली. या कारवाईने अवैध दारु व्यवसाय करनार्यांचे धाबे दणानले अाहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.