शिरपूरजवळ पुन्हा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

0 1,346

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खांदला गावाजवळ शनिवारी अपघात झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास  झालेल्या अपघातामध्ये एक इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

शनिवारी सकाळी आपल्या कामासाठी देवा गणपत कोहचाडे (35) राहणार मातारदेवी जिल्हा चंद्रपूर कोरपण्याकडे जात होते. ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरी करून करीत होते. जात असतांनाच त्यांच्या दुचाकी (क्रमांक एम एच 34 झेड 5739) ला एक अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेत देवाला डोक्याला जबर मार लागला. अति रक्तस्रावाने देवाचा जागीच मृत्यू झाला.

धडक देणारे वाहन अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाले. उत्तरीय तपासणीसाठी देवाला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर  शरीर देवाच्या कुटुंबियांच्या सुपूर्द करण्यात आले.

घरचा कामावणारा मुख्य व्यक्ती गेल्याने देवाचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. देवाच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार दीपक इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. सुबत दिवेकर करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.