चिमुकल्यांसाठी तान्हा पोळ्यानिमित्त बैल सजावट स्पर्धा

बक्षिसांची लयलूट... प्रत्येक स्पर्धकांना आकर्षक बक्षिस

13

बहुगुणी डेस्क, वणी: तान्हा पोळ्यानिमित्त पोस्ट कॉलोनी हनुमान मंदिर येथे भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सं. 4.30 वाजता ही स्पर्धा होणार आहे. या निमित्त चिमुकल्यांसाठी बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट राहणार आहे. सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे राज्य कारकारीणी सदस्य विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन व जेसीआय वणीच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. गट अ हा वय 1 ते 6 तर गट ब हा वय 6 ते 12 असा आहे. दोन्ही गटातील पहिल्या 5 विजेत्यांना सायकल बक्षिस दिली जाणार आहे. याशिवाय लकी ड्रॉ मधून 10 विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. यात क्रिकेट कीट, स्कूटर इत्यादी आकर्षक वस्तूंचा समावेश आहे. तर प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक भेट दिली जाणार आहे.

ही स्पर्धा सं. 4.30 वा. पोस्ट कॉलोनी हनुमान मंदिर, नगर पालिका शाळा क्र. 5 जवळ होणार आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी सागर मुने 9028903511 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. स्पर्धेत चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विजय चोरडिया यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.