शालिनी रासेकर यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती

राजीव गांधी पंचायत राज संगठनच्या प्रदेश सचिवपदी

9

पुरुषोत्तम नवघरे, वणी: काँग्रेसच्या ज्येष्ट कार्यकर्त्या व माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर यांची राजीव गांधी पंचायतराज संगठणच्या प्रदेश सचिवपदी निवड झाली. राष्ट्रीय अध्यक्षा मीनाक्षी नटराजन यांनी हीनियुक्ती केली. याबाबत महाराष्ट्र प्रभारी नारायणसिंह राठोड, प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. शालिनी रासेकर या वणीच्या नगराध्यक्ष होत्या. विवेकानंद प्राथमिक विद्यालयातून त्या सेवावृत्त झाल्यात. सामाजिक क्षेत्रांतही त्या नेहमी अग्रेसर राहतात. त्यांच्या निवडीबद्दल कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्‍त केले. त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.