15 ऑगस्ट निमित्त सकाळी तिरंगा बाईक रॅली

भाजयुमोचे आयोजन, स 9.30 वा. राम शेवाळकर परिसरातून सुरुवात

9

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता युवामोर्चा पार्टीच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बाईक रॅलीला सकाळी ९:३० वाजता शेवाळकर परिसर येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर साई मंदिर – टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, भारत माता चौक, तलाव रोड, नटराज चौक, इंगोले मेडिकल, सुभाषचंद्र बोस चौक, सर्योदय चौक, आंबेडकर चौक असा प्रवास करीत टिळक चौक ते विश्रामगृह येथे रॅलीचा समारोप होणार आहे. या तिरंगा बाईक यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन भाजयुमोचे जिल्हा महामंत्री निखिल खाडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, तालुका अध्यक्ष राहुल कुत्तारमारे व आशिष डंभारे यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.