बहुगुणी डेस्क, वणी: बाहेर फिरायला जाते असे सांगून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. वणी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 16 वर्षाची आहे. ती वणीतील एका कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात शिकते. ती तिच्या आई वडिलांसह तालुक्यातील एका गावात राहते. सोमवारी दिनांक 29 जुलै रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास ती आईला बाहेर फिरायला जाते असे सांगून घरून निघून गेली. मात्र ती रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी गावात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. मात्र मुलीचा पत्ता लागला नाही. त्यांना मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. अखेर मुलीच्या आईने वणी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.