वणीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली घटना

11

बहुगुणी डेस्क, वणी: गळफास घेऊन एका इसमामे आत्महत्या केली. शहरातील आंबेडकर चौक परिसरात मंगळवारी दिनांक 30 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विजय मोरोती डवरे (58) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी घरी कुणी नसताना विजय यांनी घराच्या सिलिंगला गळफास घेतला. 6 वाजताच्या सुमारास त्यांचे कुटुंबीय घरी आले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने याची माहिती शेजारी व पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. विजय यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. प्रकऱणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.