लालगुडा चौपाटीवर थरार… शस्त्र घेऊन एकाची भाईगिरी

दहशत पसरवणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

10

विवेक तोटेवार, वणी: धारदार शस्त्र हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालत असलेल्या ऑटो चालकाला वणी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. राजीव राधेश्याम पर्बत (24, रा. नवीन वागदरा, वणी) असे आरोपीचे नाव आहे. वणी-घुग्गुस मार्गावरील लालगुडा चौफुली येथे नगराळे टी शॉपसमोर एक व्यक्ती हातात धारदार चाकू घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती वणी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. माहिती मिळताच या पथकातील विकास घडसे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसीम, गजानन कुळमेथे, श्याम राठोड हे लालगुडा चौकात तातडीने पोहोचले. पोलिसांनी आरोपीला शरणागती पत्करायला सांगितले असता, त्यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. अटक टाळण्यासाठी त्याने पोलिसांच्या दिशेने चाकू भिरकावला. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून आरोपी राजीव राधेश्याम पर्बत याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 40 सेमी लांबीचा (मुठीसह) एक धारदार चाकू हस्तगत केला. अवैधरित्या शस्त्र बाळगून धुमाकूळ घालत असल्याच्या फिर्यादीवरून आरोपी राजीव राधेश्याम पर्बत याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.