पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुद्ध जयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. महालक्ष्मी इन्फोटेक वणी यांच्या वितीने ‘तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवननावर प्रकाश’ या विषयावर निबंध स्पर्धा व विविध कार्यक्रम घेऊन बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र नालमवार संचालक महालक्ष्मी इन्फोटेक होते तर प्रमुख पाहुणे रुपाली बोरगमवार या होत्या. निबंध स्पर्धेत गट अ मध्ये साक्षी रमेश गेडाम ही प्रथम आली तर द्वितीय – निखिल धर्मा ढुरके, तृतीय -हर्षिता बाळकृष्ण काटकर आलेत. गट ब – प्रथम – प्रियंती लक्ष्मण पोंनलवार, द्वितीय – प्रतीक्षा भीमाशंकर पुसाटे, तृतीय – पायल संजय दुर्गमवार आलेत. त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमान झिलपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्वेता टेकाम, मोनाली शिरगमवार, पायल पाल, अनुष्का क्षीरसागर, प्रणाली करकाडे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.