लाठी येथे कबड्डीचे भव्य सामने

0 559

निकेश जिलठे, वणी: जय बजरंग क्रीडा मंडळ लाठी व लाठी ग्रामस्थांच्या वतीने कबड्डीचे भव्य सामने आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 1 आणि 2 फेब्रुवारीला हे सामने होणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठीच्या पटांगणात हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात बक्षिसांची लूट आहे. गुरुवारी 1 फ्रेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता उद्घाटन समारंभ आहे. त्यानंतर लगेच कबड्डीच्या सामन्याला सुरुवात होणार आहे.

या सामन्यांचे उद्घाटक म्हणून सुनील कातकडे अध्यक्ष इंदिरा सहकारी सूत गिरणी वणी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आर के सिंह मुख्य महा प्रबंधक वेकोली नॉर्थ एरिया असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर इंगोले असणार आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षिस 20 हजार रुपये आहे. द्वितीय बक्षिस 15 हजार रुपये, तृतिय बक्षिस 10 हजार रुपये तर चतुर्थ बक्षिस 5 हजार रुपये आहे. याशिवाय अनेक उत्तेजनार्थ बक्षिसांची लूट आहे.

या सामन्यांची प्रवेश फी 701 रुपये असून या स्पर्थेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक राजेंद्र खोके, अजय गोवारदिपे, मुकेश खिरटकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: अजय गोवारदिपे – 9767764404, राहुल खिरटकर- 9881704964, राजेंद्र खोके 9757142530 यांच्याशी संपर्क साधावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.