आज संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वणी विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमाचे आयोजन

10

बहुगुणी डेस्क, वणी: दातृत्वाचे धनी व समाजकारणी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात गुरुवारी दिनांक 23 मे रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, धार्मिक, आरोग्य, शेतीविषयक उपक्रमांचा समावेश आहे.

स. 8 वाजता रंगनाथ स्वामी मंदीर, वणी येथे पूजा व सत्कार समारंभ, स. 9 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी, 10.30 वाजता कायर, दुपारी 11 वाजता मुकुटबन, दु. 12.30 वाजता भीमनाळा, घोन्सा येथे दु 1 वाजता. वणी येथे दु. 2 वा. तर दु. 4 वाजता मारेगाव येथील शेतकरी मंदिर व संध्या 6 वाजता वणी येथील बाजोरिया लॉन येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाला स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजय खाडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.