पुरुषोत्तम नवघरे, वणी: तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शहरातील एस.पी.एम. हायस्कूलच्या मागे भीमनगरच्या खुल्या पटांगणात बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय प्रबोधनकार विकास राजा हे कार्यक्रम सादर करणार असून यात बॉलीवूड गीतकार तथा भीमशायर प्रणय सतलज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन वणीतील यंग इंडिया ऑफ आंबेडकर राइट मूव्हमेंट यांनी केले आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.