घरफोडी, दुचाकीचोरी नंतर आता शहरात टायर चोरी

एकाच रात्री दोन पंक्चरच्या दुकानात चोरी, 25 जुने टायर लंपास

9

बहुगुणी डेस्क, वणी: आधीच घरफोडी, दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना आता पंक्चरच्या दुकानातील जुने टायरही चोरट्यांना कमी पडत आहे. लालपुलिया परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री दोन पंक्चरच्या दुकानात चोरी केली. चोरट्यांनी 25 जुने टायर चोरून नेले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार नैमुद्दीन मोहम्मद नसिम शेख (25) रा. राजूर कॉलरी येथील रहिवासी असून त्याचे लालपुलिया जवळील रामदेवबाबा मंदिरासमोर टायर पंक्चर दुरुस्तीचे दुकान आहे. या ठिकाणी तो जुने टायर विक्रीही करतो. तर मोहम्मद जाहीद हदीस अली (34) रा. लालपुलिया वणी येथील रहिवासी आहे. त्यांचे परिसरातच एसीएस पेट्रोल पम्प जवळ टायर पंक्चरचे दुकान असून तो तिथे जुने टायर विक्रीही करतो.

दोन्ही तक्रारदार हे 28 एप्रिल रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. दुस-या दिवशी ते दुकानात आले असता त्यांना दुकानातील जुने टायर चोरीला गेल्याचे आढळले. एका दुकानातून 15 तर दुस-या दुकानातून 10 टायर चोरीला गेले. दुकान मालकांनी परिसरात व भंगारच्या दुकानात शोध घेतला. मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही.

अखेर सोमवारी दिनांक 13 मे रोजी दोन्ही दुकानदारांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.