बोरी (ईचोड) येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

0 482

देवेंद्र खरवडे, वणी: जय जगन्नाथ क्रीडा मंडळ व समस्त गावकरी बोरी यांच्या वतीने दि. 26 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान कबड्डीच्या भव्य खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने मोहता ग्राउंड बोरी (ईचोड) त. राळेगाव जी. यवतमाळ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वडकी पो. स्टेशन चे ठाणेदार पवार साहेब लाभणार आहे तर अध्यक्ष म्हणून गावातील पहिले डॉक्टर यवतमाळ येथील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ बाबाराव येलके असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रत्नमाला खिरटकार ,उपसरपंच प्रमोद देठे पोलिस पाटील देवानंद गमे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश आवारी, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल जवादे, नरेश खांदनकर असणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघास प्रथम पारितोषिक सर्व गावकरी बोरी ईचोड यांचे तर्फे 20001, द्वितीय बक्षीस आपली माती आपली माणस ग्रुप (बाहेरगावी नोकरीला असलेले गावकरी) तर्फे 15001, तृतीय बक्षीस गावातील कर्मचारी वृंदातर्फे 10001 व चतुर्थ बक्षीस जगन्नाथ क्रीडा मंडळ तर्फे 5001 बक्षिस वितरीत करण्यात येणार आहे. परिसरातील क्रीडा मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.