शनिवारपासून छ. शिवाजी महाराज उद्यानात भव्य मोफत योग शिबिर

स. 5 ते 7 या वेळेत 3 दिवस आचार्य साध्वी देवप्रिया करणार मार्गदर्शन

20

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथे सुप्रसिद्ध योगगुरु व महिला पतंजली योग समितीच्या केंद्रीय प्रभारी आचार्य साध्वी देवप्रिया यांचे तीन दिवशीय मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशपूर रोडवरील छ. शिवाजी महाराज उद्यान येथे शनिवारी दिनांक 11 मे ते 13 मे पर्यंत सकाळी 5 ते 7 या वेळेत हे योग शिबिर होणार आहे. सदर शिबिर हे सर्वांसाठी खुले असून पतंजली योग परिवार व संपूर्ण योग साधक वणी यांच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले आहे.

या शिबिरात आधुनिक समग्र योग साधनेद्वारा विविध व्याधींवरील उपचार, नैसर्गीक आयुर्वेदिक उपचार पद्धती, पंतकर्म, पटकर्म, ध्यान धारणा, सुक्ष्म व्यायाम चिकित्सा यासह ताणतणावविरहित जीवन कसे जगावे यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात महिला पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र प्रभारी संजीवनी माने, राज्य कार्यकारिणी सदस्य माया चव्हाण या देखील मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गुड मॉर्निंग गृप यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.