विवेक तोटेवार, वणी: शहरातील दामले फैल येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवार दिनांक 23 एप्रिलला दुपारी 2 वाजताच्या सुमारास आपल्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मनोज भाऊराव उंदिरवाडे (36) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. भाऊराव उंदिरवाडे यांना दोन मुले आहे. यांच्यात मोठा मुलगा म्हणजे मनोज. मनोज हा दामले फैल येथे राहत होता व तो मजुरीचे काम करायचा. तो वडिलांच्या घरा शेजारी आपली पत्नी व दोन मुलांसोबत राहत होता. मंगळवारी मनोजच्या मोठ्या मुलाला दुपारच्या सुमारास वडिलांनी गळफास घेतल्याचे बघितले. त्याने यांची माहिती आपल्या आजोबाला दिली. ते जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांना घराच्या फाट्याला त्यांचा मुलगा मनोज हा घराच्या फाट्याला दोरीने गळफास घेऊन असलेला दिसून आला. भाऊराव यांनी शेजाऱ्यांना याबाबत सांगितले व त्यांच्या मदतीने मनोजला खाली उतरवले. नंतर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून मृत असल्याचे सांगितले. याबाबत वणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.