वणीत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

भव्य शोभायात्रेने वेधले वणीकरांचे लक्ष

8

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी गुरुवारी महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी माळी समाज युवा समिती द्वारा भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने माळी समाजासह इतर समाज बांधवही उपस्थित होते.

सकाळी 11 वाजता शहरातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या तैलचित्राला मालार्पण करण्यात आले. संध्याकाळी 6 वाजता शोभायात्रा काढण्यात आली. माळीपुरा येथून निघालेली ही शोभायात्रा संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत महात्मा फुले चौकात या शोभायात्रेची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन वाढई, प्रमोद निकोडे, भास्कर वाढई, बापूजी वाढई यांच्या मार्गदर्शनात प्रवीण निकोडे, बंडू वाढई, अक्षय निकोडे, हर्षल शेंडे, दशरथ निकोडे, नितीन मांदाडे, सुयोग भेंडाळे, अजय चौधरी, देव वाढई यांच्यासह माळी समाज युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.