अल्पवयीन मुलगी गर्भवती, प्रियकर गजाआड

विविध कलमानुसार प्रियकरावर गुन्हा दाखल

9

विवेक तोटेवार, वणी: घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला गर्भवती करणे एका मजनूला चांगलेच महागात पडले. मुलीच्या तक्रारीवरून प्रियकर आरोपीविरोधात वणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली.

आरोपी हा 30 वर्षांचा असून तो तालुक्यातील एक गावातील रहिवासी आहे. त्याचे शेजारीच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी (17) सूत जुळले. पुढे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. डिसेंबर महिन्यात मुलीच्या पोटात गर्भ वाढू लागला. दरम्यान मुलगी 4 ते 5 महिन्याची गर्भवती झाल्याने मुलीच्या शरीरात बदल झाले. हे बदल मुलीच्या आईला लक्षात आले. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलीने सर्व कहाणी आपल्या आईला सांगितली.

पीडिता ही अल्पवयीन असल्याने पीडितेच्या आईने तात्काळ वणी पोलिसात याबाबत माहिती दिली. मंगळवारी दिनांक 9 एप्रिल रोजी रात्री पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी (30) याच्यावर कलम 376, 2 (एन), 3,4 सहकलम पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा तपास पोउपनी अश्विनी रायबोले करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.