विजय चोरडिया यांचा वणी विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा धडाका

मारेगाव येथे ठिकठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा

13

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून यात भाजप व मित्रपक्षातर्फे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया हे देखील या रणधुमाळीत उतरले आहे. रविवारी दिनांक 7 ए्प्रिल रोजी मारेगाव येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ विजय चोरडिया यांनी मारेगाव येथे ठिकठिकाणी कॉर्नर सभा व गृहभेट घेतली.

विकासाला मतदारांची पसंती – विजय चोरडिया
गेल्या वेळी चंद्रपूरची जागा काँग्रेसकडे गेली. मात्र यावेळी संपूर्ण जोर लावून ही जागा परत भाजपकडे आणण्यासाठी आम्ही सर्व नेते, कार्यकर्ते कामाला लागलो आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वावर मतदारांचा विश्वास आहे. मतदारसंघात विकासाला मतदारांची पसंती दिसून येत असून यावेळी भाजपचा विजय निश्चित आहे.

मारेगाव येथील विविध वार्डात जाऊन विजय चोरडिया यांच्या नेतृत्त्वात भाजप सरकारने राबवलेल्या विविध योजना. तसेच आगामी काळात राबविण्यात येणा-या योजना याबाबत मतदारांना माहिती देण्यात आली. सुधीर मुनगंटीवार निवडून आल्यास त्यांचे कॅबिनेटमंत्रीपद निश्चित आहे. मतदारसंघात अनेक कामे अपूर्ण आहेत. ती कामे पूर्ण होण्यास सुधीर मुनगंटीवार यांना संधी द्या, असे आवाहन विजय चोरडिया यांच्या तर्फे कऱण्यात आले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते तसेच समर्थक उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.