फासावर लटकवून 42 वर्षीय इसमाने आपला जीव संपवला

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोली येथील घटना

9

बहुगुणी डेस्क, वणी: गावाजवळील शेताच्या बांधावरील झाडाला दुपट्ट्याचा गळफास लावून एका 42 वर्षीय इसमाने आत्महत्या केली. ही घटना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोली येथे घडली. गजानन विठूजी सातघरे असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. या इसमाने गुरुवार दिनांक 4 एप्रिलच्या रात्री आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. ही घटना शुक्रवार दिनांक 5 एप्रिलच्या सकाळी उघडकीस आली.

परिवारातील सदस्य आणि गावकऱ्यांना ही बातमी कळतच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरपूर पोलीस स्टेशनने पंचनामा करून मृतदेह झाडावरून खाली उतरवला. नंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले. गजानन यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळले नाही. त्यांच्या आत्महत्येमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.