असं काय झालं? की थेट तलवारीनेच हल्ला

राजूर कॉलरी येथील थरारक घटना

14

विवेक तोटेवार, वणी: शीघ्रकोप माणसाला कोणत्याही स्तरावर नेऊ शकतो. अशावेळी त्याच्या हातून काहीही होऊ शकतं. हा प्रत्यय शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास राजूर कॉलरी येथे आला‌. त्या दोन युवकांमध्ये कुठलातरी जुनाच वाद होता‌. याच वादातून एका 24 वर्षीय तरुणाने दुसऱ्यावर तलवारीने हल्ला केला. या प्रकरणी तक्रारीवरून तिघांविरुद्ध वणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

नजीकच्या राजूर कॉलरी येथे रामकरण दयाप्रसाद केवट हा मजुरी करतो. हिमेश बहुरिया (23) हा राजूर येथील तरुण आपल्या दोन मित्रांसह रामकरण जवळ आला. कदाचित काही वाद झाला असावा. नंतर हिमेशने रामकरणच्या हातावर आणि डोक्यावर तलवारीने वार केलेत. तिथून हिमेश आपल्या साथीदारांसह पसार झाला. या घटनेत रामकरण गंभीर जखमी झाला. त्याने लगेच पोलीस ठाण्यात धडक दिली. तिथून त्याला पुढील उपचाराकरिता त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले‌. वैद्यकीय अहवाल आणि रामकरण यांच्या तक्रारीनुसार हिमेश बहुरिया आणि त्याच्या दोन साथीदारावर भादंवी 324/ 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास अमोल अन्नेरवार करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.