चिखलगावात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

0 575

वणी (रवि ढुमणे): शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे जय हिंद क्रीडा संवर्धन मंडळाच्या वतीने तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला हार अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली.

गेल्या तीस वर्षांहून अधिक काळापासून चिखलगाव येथील जय हिंद क्रीडा संवर्धन मंडळाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. या दरम्यान कबड्डीचे खुले सामने सुद्धा आयोजित करण्यात येत होते. दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती चिखलगावात साजरी करण्यात येते.

23 जानेवारीला इंदिरा सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष तथा चिखलगावचे माजी सरपंच सुनील कातकडे, सरपंच अनिल पेंदोर, उपसरपंच अमोल रांगणकर, रामचंद्र वाभिटकर, ग्राम पंचायत सदस्य,जय हिंद क्रीडा मंडळाचे सदस्य व ग्रामस्थांनी उपस्थित राहून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैलचित्राला हारार्पण करून जयंती साजरी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.