विवाहीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरुच

17

वणी बहुगुणी डेस्क: तालुक्यात आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. पळसोनी येथे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी दिनांक 27 मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रणिता शंकर भट (अंदाजे 25) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्रणिता हिचे अडीच वर्षांआधी लग्न झाले. ती तिचे पती शंकरसह पळसोनी येथे राहत होती. मंगळवारी सकाळी तिचा पती कामासाठी वणी येथे गेला. दरम्यान घरी कुणी नसताना प्रणिताने घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास शंकरची आई घरी गेली असता ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. प्रणिताच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र नैराश्यातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

गोटमार यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या मुलीला नेले पळवून

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.