पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा आढळला मृतदेह

रेल्व क्वॉर्टर येथील घटना, अती मद्य प्राशनाने मृत्यू झाल्याचा अंदाज

14

बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांपासून पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा घरात मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री रेल्वे क्वॉर्टर वणी येथे ही घटना उघडकीस आली. आतिश अशोक लाडे असे मृत पतीचे नाव आहे. अती मद्य प्राशनाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहिती नुसार, आतिश अशोक लाडे (42) हा मुळचा चंद्रपूर येथील रहिवासी होता. त्याचे रेल्वे कर्मचारी असलेल्या सपना सालूरकर यांच्याशी विवाह झाला. तो आपल्या पत्नीसह व मुलासह वणीतील रेल्वे क्वार्टर येथे राहत होता. लग्नानंतर आतिशला मद्य सेवनाची सवय जडली. त्यामुळे पती पत्नीत खडके उडू लागले. त्यामुळे त्यांच्या पत्नीने माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या त्यांच्या मुलाला घेऊन माहेरी राहत होत्या.

तेव्हापासून आतिश रेल्वे क्वार्टरवर एकटाच राहायचा. दरम्यान त्याची मद्य सेवनाची सवय वाढत गेली. सोमवारी दिनांक 18 मार्च रोजी त्याने मद्यसेवन केले. मात्र त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने चंद्रपूर येथे आपल्या आईला कॉल करून याबाबत माहिती दिली. मुलाला अस्वस्थ वाटत असल्याने आतिशच्या आईने आतिशच्या पत्नीला फोन केला.

रात्री 12 वाजताच्या दरम्यान त्या पतीला पाहण्यासाठी रेल्वे क्वार्टर येथे गेल्या. तिथे आतिश हा बेडवर पडून दिसला. त्यांनी आतिशला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र आतिशने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर सपना यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहेचले. त्यांनी आतिशला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अती मद्यसेवनाने आतिशचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

शहरात घरफोडी, दुचाकी चोरी थांबेना, पोलिसांना चोरटे गवसेना

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.