टेलरिंग व्यवसाय करणा-याची गळफास घेऊन आत्महत्या

वणीतील घटना, तालुक्यात सुरु झाले आत्महत्येचे सत्र

7

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात पुन्हा एक आत्महत्येची घटना समोर आली. खरबडा मोहल्ला येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी दिनांक 15 मार्च रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. मारोती विठ्ठल ठावरी (अंदाजे 42) असे मृतकाचे नाव आहे. मारोती हा आपल्या कुटुंबीयांहसह खरबडा मोहल्ला येथे राहायचा. ते घरीच टेलरिंगचा व्यवसाय करायचे. सकाळच्या सुमारास त्यांची पत्नी आणि मुलगा घराबाहेर गेला होता. दरम्यान घरी कुणी नसल्याची संधी साधून मारोतींनी घऱीच गळफास घेतला. त्यांची पत्नी व मुलगा घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठवला. मारोती यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र त्यांनी नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मारोती यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. तालुक्यात सततच्या आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असल्याने याबाबत प्रशासनाने योग्य ती जनजागृती करणे गरजेचे झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.