शिक्षकाची हुडकेश्वर मंदिर परिसरात आत्महत्या

विष प्राशन करून संपवले जीवन, तालुक्यात सततच्या आत्महत्या

15

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कायर येथे एका खासगी शाळेत नोकरी करीत असलेल्या शिक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. आज रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बळवंत कवडू जुमनाके (35) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो कायर येथे कुटुंबीयांसह राहायचा. आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास त्याने कायर जवळ असलेल्या हुडकेश्वर मंदिर परिसरात त्याने विश प्राशन केले. दरम्यान ही बाब मंदिर परिसरात असलेल्या काही लोकांच्या निदर्शनास आली. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. लोकांनी तातडीने याची माहिती बळवंतच्या कुटुंबीयांना दिली. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली. शिरपूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. बळंवंतने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. सततच्या आत्महत्येने वणीची ओळख आता ब्लॅक डायमंड नाही तर आत्महत्येचा तालुका अशी होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.