सत्या गृपतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त उपक्रम

11

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शाळा क्रमांक 8 येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सत्या गृप या तर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांचे या शिबिराला सहकार्य लाभले. या उपक्रमाला संजय देरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे शिबिर चालले. याशिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  लाईफ लाईनचे डॉ. अविनाश बभारे, भाग्यश्री लांजेवार, भाग्यश्री खरवडे, वैभव बाराहाते, प्रवीण पायघन या टीमने आपली सेवा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्या गृपचे अध्यक्ष सतिश तेवर, फैजल बशिर खान, तुलसी तेवर, निखिल येरणे, विक्री कळसकर, सूरज देठे, स्वप्निल आत्राम, अनिकेत कुरेवार, असलान शेख, रौनक तरारे, भूषण सहारे, क्रुष्णा निमसटकर यांनी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.