विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मंदर येथे एका 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शनिवार सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उमेश प्रकाश पेंदाने (25) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. उमेश हा काही दिवसांपूर्वी वणीतील एका बँकेत चहापाणी देण्याचे काम करीत होता. परंतु काही कारणास्तव त्याने नोकरी सोडली होती. त्यानंतर तो घरीच होता. शनिवार सकाळी 7 वाजताच्या सुमारास घरात कुणी नसल्याचे बघून उमेश याने आपल्या घरीच लाकडी फाट्याला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. कुटूंबियांनी माहिती होताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.