आज वणीत वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा

खंडोबा वाघोबा देवस्थानाच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष करणार मार्गदर्शन

9

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता स्थानिक खंडोबा वाघोबा देवस्थानात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक प्रशांत चंदनखेडे, गौतम जीवने, पुखराज खैरे, चंद्रमणी दसोडे, बंडू गणवीर, रज्जत सापुते, विनोद गजभिये, संतोष पेंदोर, नरेंद्र वाळके, प्रशांत गाडगे, आकाश बोरकर, डॉ. प्रशील बरडे, राकेश तावाडे आदींनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.