संजय भाऊ देरकर वाढदिवस साधेपणात पण उत्साहात साजरा

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

15

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिवसेना नेते, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, वणी नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष संजय देरकर यांचा 17 जानेवारीला साधेपणात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घरी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्यात. यानिमित्त संजय देरकर यांच्या तर्फे शाल श्रीफळ देऊन विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचा सत्कार केला. यात सामाजिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, राजकीय क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्राचा समावेश होता. वाढदिवसानिमीत्य विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत भविष्यातील वाटचालीबाबत संजय देरकर यांनी हितगूज केले. याशिवाय वणी नागरी सहकारी बँके कडून विधवा महिलांना साडी-चोळी देवून सन्मानीत करण्यात आले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आणि भेट घेत संजय देरकर यांना शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.