वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळ एका दुचाकीने डिव्हायडरला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अनिल पोराते (26) रा. सुकनेगाव ता. वणी असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अनिल हे आपल्या एका मित्रासह मारेागव येथे आले होते. दरम्यान काम आटपून परत जाताना करणवाडी बस स्टॉप जवळ अनिलचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकीने डिव्हायडरला धडक दिली. यात अनिल गंभीर जखमी झाला. तर मागे बसलेला त्याचा साथीदार किरकोळ जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच बस स्टॉप जवळील काही लोकांनी त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.