नात जावयाची मध्यरात्री घरी जाऊन सास-याला दगडाने मारहाण

घराच्या बांधकामावरून वाद, नात जावयाचा दारूच्या नशेत धिंगाणा

15

बहुगुणी डेस्क, वणी: बांधकामावरून असलेल्या वादातून नात जावयाने मध्यरात्री सास-याच्या घरी जाऊन सास-याला दगडाने जबर मारहाण केली. यात सास-याच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. शहरातील जैन ले आऊट मध्ये ही घटना घडली. याबाबत वणी पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी (63) हे वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते त्यांच्या 30 वर्षीय मुलासह जैन ले आऊट येथे राहतात. रविवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या मुलासह घरी झोपून होते. दरम्यान त्यांची नात (चुलत) तिच्या पतीसह घरी आली. यावेळी त्यांच्या नातीचा पती (नात जावई) हा दारू पिऊन होता.

नातीच्या लहान बहिणीच्या घराचे काम सुरू आहे. यात ठेकेदार करून देण्यास फिर्यादीने मध्यस्थी केली होती. मात्र ठेकेदार योग्य पद्धतीने काम करीत नसल्याने फिर्यादीचा नात जावई सास-यावर संतापून होता. त्यामुळे घरी जाऊन नात जावयाने वाद घालीत फिर्यादी सास-याशी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान फिर्यादीचा मुलगा मध्ये पडला व त्याने जावयाला तुम्ही दारू पिऊन असल्याने उद्या बोलू असे सांगितले.

त्यामुळे जावई चिडला व त्याने फिर्यादीच्या डोक्यावर दगडाने मारहाण केली. जावई क्रोधात असल्याने मुलाने जावयाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला देखील शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली. अखेर फिर्यादीने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नात जावयाविरुद्ध भादंविच्या कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.