निराधार व गरजूंना ब्लॅकेट, उबदार कपड्यांचे वाटप

विजय चोरडिया यांच्या मदतीने व नगर सेवा समितीच्या वतीने

17

पुरुषोत्तम नवघरे, वणी: श्री संत गाडगे महाराज यांच्या 67 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंगळवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री निराधार, गरजूंना ब्लँकेट, स्वेटर, उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या मदतीने व नगर सेवा समितीच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोरील इमारती पासून या उपक्रमाला सुरुवात झाली. संपूर्ण शहरात फिरून, बस स्टँड परिसर, शिवतीर्थावरील नगरपरिषद कॉम्प्लेक्स समोर परिसर, महावीर भवन, गांधी चौक परिसर, रंगनाथ स्वामी मंदिर परिसर, हनुमान मंदिर इत्यादी भागात व ग्रामीण रुग्णालयात जाऊन उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. नगर सेवा समितीतर्फे दरवर्षी हिवाळ्यात हा उपक्रम राबवण्यात येतो. यावेळी नगर सेवा समितीचे नामदेवराव शेलवडे, दिनकरराव ढवस, दिलीप कोरपेनवार, राजू तुरणकर, सागर मुने, विकास जयपूरकर, प्रदीप मुके, सागर जाधव, भास्कर पत्रकार, नितीन बिहारी, मत्ते यांची उपस्थिती होती.

चालत्या कारने घेतला अचानक पेट, बाजार समितीजवळील घटना

शाहरुख येतोय, सुजाता थिएटरमध्ये डंकी सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.