20 वर्षीय विवाहित तरुणीची गळफास घेउन आत्महत्या

वणीतील शास्त्री नगर येथील घटना

9

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी इसलेल्या 20 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ही उघडकीस आली. जयश्री राजू कुळसंगे असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. जयश्री ही काही महिन्यांपासून माहेरी आईकडे शास्त्री नगर येथे राहत होती. ती कॅटरर्स कडे नोकरी करायची. आज शनिवारी दिनांष 9 डिसेंबर रोजी दुपारी घरी कोणीही नसताना जयश्रीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. जयश्रीची आई घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. तिच्या आईने शेजारच्या लोकांच्या मदतीने जयश्रीला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. जयश्रीने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.