विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आता वणी तालुक्यातही वाढत्या आत्महत्या

12

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील डोर्ली येथे एक विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. संदीप शालीक परचाके (26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप हा रोजमजुरीचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी संदीपची पत्नी माहेरी गेली होती. तर आई वडील हे शेतावर कामावर गेले होते. घरी कुणीही नसल्याची संधी साधून संदीपने गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास संदीपचे आईवडील घरी आले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी त्वरित शिरपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेचा तपास शिरपूर ठाण्याचे पोहेकॉ गंगाधर घोडाम करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.