शासकीय ITI जवळ दोन दुचाकीची धडक

शिरपूर येथील पोलीस शिपाई जखमी, रात्री झाला अपघात

62

विवेक तोटेवार, वणी: कार्यालयीन कामासाठी शिरपूरहून वणी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा परत जाताना आयटीआय जवळ अपघात झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विनोद मोतेराव (35) असे जखमी कर्मचा-याचे नाव असून त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे. 

विनोद मोतेराव (35) हे पोलीस शिपाई या पदावर शिरपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. रविवारी 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास वणीत ते डेटा अपलोडींगच्या कामासाठी वणी येथे आले होते. काम संपवून ते शिरपूर येथे परतत आयटीआय जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

त्यामुळे विनोद हे खाली कोसळले व त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली. या अपघातात त्यांच्या जबड्याला मार असल्याची माहिती आहे. सदर घटनेची महिती मिळताच शिरपूर व वणी ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.

विनोद यांना आधी वणीतील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.