वरोरा रोडवरील रेडिमेड कपड्याचे दुकान चोरट्यांनी फोडले

दिवाळीच्या आधी अडीच लाख रुपयांचे कपडे लंपास...

277

विवेक तोटेवार, वणी: वरोरा रोडवर स्थित महेश सिलेक्शन नामक रेडिमेड कापड दुकान चोरट्यांनी फोडले. यात सुमारे 2.5 लाखांचे कपडे चोरट्यांनी लंपास केले. बुधवार 25 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दुकान मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

गोपाल शंकरलालजी जकोटिया रा. वरोरा यांच्या मालकीचे वणीतील वरोरा रोडवर महेश सिलेक्शन नामक कपड्याचे दुकान आहे. 25 ऑक्टोबर बुधवार रोजी गोपाल हे नेहमीप्रमाणे रात्री आपले दुकान बंद करून घरी निघून गेले. रात्रीच्या सुमारास चोरट्यानी छपरावरील आतून लावलेली कडी तोडून दुकानात प्रवेश केला. 2 लाख 42 हजार रुपयांचे कपडे व 500 नगदी चोरून नेले.

26 ऑक्टोबर रोजी गोपाल यांनी दुकान उघडल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्या लक्षात चोरी झाल्याची बाब आली. त्यांनी घटनेची माहिती वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. गेल्या वर्षी चोरट्यांनी दुकाने फोडण्याचा सपाटा लावला होता. काही काळापासून हे थांबले होते. मात्र आता पुन्हा चोरट्यांनी दुकाने फोडायला सुरूवात केल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.