मंदरजवळ अपघात, दुचाकीचालक गंभीर जखमी

कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक

1,506

जितेंद्र कोठारी, वणी: वणी चारगाव घुग्गुस मार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. तर दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाला किरकोळ इजा झाली. सदर घटना शुक्रवार 29 सप्टे. रोजी सकाळी 11.30 वाजता दरम्यान केसुर्ली फाट्याजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर येथील प्रतीक राजन बांगडे आपल्या रेनाल्ट डस्टर कार क्रमांक MH 34 AM 0907 ने वणी येथून चंद्रपूर कडे जात होते. दरम्यान केसुर्ली फाट्याजवळ विरुध्द दिशेने येणारी भरधाव दुचाकी क्र. MH34BU 7867 ने कारला समोरून जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती कि, डस्टर वाहनाची विंड स्क्रीन फुटली तसेच डाव्या बाजूची डिस्क चेंदामेंदा झाली. या अपघातात दुचाकी चालकाच्या हातापायाला तसेच डोक्याला गंभीर इजा झाली. तर दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाला किरकोळ मार लागली.

गंभीर जखमी दुचाकी चालक सोनूसिंग दारासिंग टाक (32), रा .म्हातारदेवी घुग्गुस व रतन सुरेश कालवा (30), रा. घुग्गुस याला वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. अपघाताच्या वेळी दुचाकी वरील दोन्ही युवक मद्यप्राशन करून असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.