चहापत्ती खरेदी करा आणि मिळवा शिर्डी, शनि-शिंगणापूरचा मोफत टूर

427

बहुगुणी डेस्क, वणी: किराणा दुकानदार आणि चहा विक्रेत्या कॅन्टीन चालकांसाठी एक भन्नाट ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात 3 महिन्यात एकूण 330 किलो चहापत्ती खरेदी केल्यास दोन दिवसांचा शिर्डी व शिंगणापूरचा टूर मोफत दिला जाणार आहे. यात प्रवासखर्च, राहण्याच्या व खाण्याचा सर्व खर्च केला जाणार आहे. गौरी ट्रेडर्स, एमआयडीसी वणी तर्फे ही ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर 30 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे किराणा दुकान चालक व चहा कॅन्टीन चालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गौरी ट्रेडर्स वणी व अमरावती टी कंपनीतर्फे करण्यात आले आहे. शिवाय अधिक माहितीसाठी 7798302702 या क्रमांकावर संपर्क देखील साधता येणार आहे.

काय आहे ही स्किम?
विदर्भातील सुप्रसिद्ध चहापत्ती विक्रेती अमरावती टी कंपनी व वणीतील गौरी ट्रेडर्सतर्फे ही स्किम लाँच करण्यात आली आहे. या कंपनीच्या मनपसंद या ब्रँडच्या चहावर ही ऑफर आहे. किराणा दुकान चालक किंवा चहा कॅन्टीन चालकांना 30 नोव्हेंबर पर्यंत 330 किलो चहापत्ती खरेदी करायची आहे. एकूण 330 किलो चहा पत्ती खरेदी केल्यावर 1 व्यक्तीला शिर्डी आणि शिंगणापूरचा दोन दिवसांचा मोफत टूर दिला जाणार आहे. यात शिर्डी, शिंगणापूर येथील मंदिर तसेच साई तीर्थ थीम पार्क, वेट एन जॉय वॉटरपार्कची सहल करवली जाणार आहे. जाण्यायेण्या संपूर्ण खर्च व राहण्याचा व जेवणाचा संपूर्ण खर्च कंपनीतर्फे केला जाणार आहे.

एकाच वेळी 330 किलो पत्ती घ्यावी लागेल?
या स्किमचा फायदा घेण्यासाठी एका वेळीच 330 किलो चहापत्ती घेण्याची गरज नाही. ग्राहकांना गरज असेल तेवढी चहापत्ती विकत घेता येणार आहे. ज्या दिवशी त्यांचे 330 किलो चहापत्ती खरेदीचे टारगेट पूर्ण होईल त्या दिवशी एक व्यक्ती टूरसाठी पात्र होतील. जर 660 किलो खरेदी झाली तर दोन व्यक्ती टूर साठी पात्र ठरेल. मात्र ही खरेदी 30 नोव्हेंबरच्या आत होणे गरजेचे आहे. परिसरातील वणी, वरोरा, मारेगाव, कायर, वडकी, मुकुटबन, पाटण, पुरड. झरी, शिंदोला, उकणी, भालर, करंजी, मार्डी, खैरी, माजरी, कुचना, वाढोना बाजार इ. गावातील ग्राहक या स्किममध्ये सहभागी झाले आहेत.

स्किममध्ये परिसरातील सहभागी झालेले ग्राहक

मनपसंद चहा हा अमरावती टी कंपनीचा विदर्भातील एक सुप्रसिद्ध असा चहाचा ब्रँड आहे. मनपसंद रेग्लुयर, मनपसंद प्रिमियम गोल्ड, मनपसंद विलायची यासह अनेक प्रकारची चहापत्ती या ब्रँडची उपलब्ध आहे. वणीतील एमआयडीसी परिसरात असलेले गौरी ट्रेडर्स हे या कंपनीच्या चहापत्तीचे परिसरातील अधिकृत विक्रेते आहे. गौरी ट्रेडर्स येथून ग्राहकांना ही चहापत्ती खरेदी करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी एकदा अवश्य भेट द्या….
गौरी ट्रेडर्स, एमआयडीसी, बी-17 वणी
विक्की तारुणा – मो. 7798302702 (गौरी ट्रेडर्स)
मुन्नासेठ माधोघडीया (अमरावती टी कंपनी)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.