दुचाकी चोरट्याला लालगुडा येथून अटक

14

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या सततच्या घटनेमुळे नागरिकांसोबत पोलीस विभागही हैराण झाला आहे. दुचाकी चोरट्यांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने वणी पोलीस प्रयत्नशील आहे. अशातच पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक 980/2023 कलम 379 मधील दुचाकी लालगुडा येथील इसमाने चोरी केल्याची तसेच बनावट नंबरप्लेट लावून वापरत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

माहितीवरून ठाणेदार अजित जाधव यांनी त्वरित डीबी पथकाला आरोपीला ताब्यात घेऊन तपास करण्याचे आदेश दिले. आदेशावरून डीबी पथकाने नवीन लालगुडा येथून आरोपी राजू सूरजपाल कोठारे (30) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नटराज चौक वणी येथून 4 सप्टेंबर रोजी चोरी केलेली काळया रंगाची होंडा शाईन मोटसायकल नं. MH29AG6234 किंमत 25 हजार रुपये ही जप्त केली. सदर चोरी गेलेली मोटरसायकल ही मोहोर्ली येथील सुधाकर नामदेव अन्ड्रस्कर यांच्या मालकीची असून दुचाकी चोरी बाबत त्यांनी तक्रार नोंदविली होती.

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव पीएसआय सुदाम आसोरे, जमादार विकास धडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम, शंकर चौधरी, सुनील नलगंटीवाऱ यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.