साहित्य सम्मेलनाच्या मंडपस्थानाचे भूमीपूजन 

0 413

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विदर्भ साहित्य संघाच्या वणी शाखेद्वारे वणी नगरीत दिनांक 19, 20 आणि 21 जानेवारी 2018 रोजी आयोजित सहासष्टाव्या विदर्भ साहित्य सम्मेलनाच्या स्थानी उभारण्यात येणार असलेल्या भव्य मंडपाचे भूमीपूजन, सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी सम्मेलनाच्या सर्व स्वागतसमिती सदस्यांसह वणी नगरातील अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते. राम शेवाळकर परिसरामध्ये संपन्न होणार असलेल्या या सम्मेलना करिता 150×80 फुटाचा भव्य मंडप, आकर्षक विशाल व्यासपीठ तथा विविध प्रदर्शन तथा विक्रीकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. विदर्भातील समस्त साहित्यप्रेमींनी या निमित्ताने मिळणा-या अपूर्व संधीचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे वतीने करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.