‘त्या’ गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपीही अटकेत

77

जितेंद्र कोठारी, वणी: सराईत चोरटा राजू पोटे याला वणी पोलिसांनी 6 दिवसांपूर्वीच शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली होती. आता गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या त्याच्या साथीदाराला वणी पोलिसांनी शुक्रवार 15 सप्टे. रोजी दीपक चौपाटी परिसरातून अटक केली. शेख सद्दाम शेख उस्मान (28) रा.खरबडा मोहल्ला वणी असे आरोपीचे नाव आहे. 

दिनांक 19 मे 2023 रोजी रात्री जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने काही इसम जंगली पीर दर्गाजवळ अंधारात दबा धरून बसल्याची गोपनीय माहितीवरून तत्कालीन ठाणेदार पो.नि. प्रदीप शिरस्कर यांना मिळाली होती. त्यावरून सपोनि दत्ता पेंडकर व स्टाफने रात्री 12 वाजता जंगली पीर दर्गाजवळ छापा टाकला होता.

त्याठिकाणी पोलिसांना संतोष उर्फ डोमा मेश्राम, शेख शाहरुख शेख सलीम, शेख इरफान शेख सलीम व अनिल विनायक येमुलवार आढळले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन शेख सद्दाम शेख उस्मान आणि राजू पोटे हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. दोन्ही आरोपी मागील चार महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होते.

परंतु पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून फरार आरोपीबाबत सर्व माहिती काढली. माहितीवरून कुख्यात राजू पोटे याला 10 सप्टे. रोजी वागदरा परिसरातून अटक करून जेलमध्ये पाठविले. तर त्या गुन्ह्यातील फरार दुसरा आरोपी शेख सद्दाम शेख उस्मान याला आज अटक करण्यात आली.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बंसोड, अपर पो.अधिक्षक पियूष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजीत जाधव यांच्या आदेशाने सपोनि माधव शिंदे, स.फौ. सुदर्शन वानोळे, हरिंन्दरकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, गजानन कुळमेथे यांनी केली. 

हे देखील वाचा: 

मारेगावात फुटला घरफोडीचा पोळा… एकाच रात्री 14 ते 17 चो-या ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.