अबब… 14 लाख रुपयांचा दारुसाठा वणी पोलिसानी केला नष्ट

11

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लाखो रुपयांची देशी व विदेशी अशी अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली होती. पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन रितसर पंचनामा करून सदरचा मुद्देमाल रोड रोलर फिरवून नष्ट केला. नगर परिषद डंपिंग ग्राउंडवर सोमवार 28 आगस्ट रोजी पंचासमक्ष हा अवैध दारुसाठा नष्ट करण्यात आला.

वणी पोलीस स्टेशनमधील महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत 245 गुन्ह्यातील 14 लाख 44 हजार 291 रुपयांची अवैध दारु जप्त करण्यात आली होती. न्यायालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाने सोमवार 28 आगस्ट रोजी पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहा.पोलीस निरीक्षक माया चाटसे, नायब तहसीलदार विवेक पांडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व शासकीय पंचाच्या उपस्थिती 19 हजार 778 दारु शिश्यावर रोड रोलर फिरवून दारुसाठा नष्ट करण्यात आला.  

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.