मेंढोली येथील मनोहरराव ताजने यांचे निधन

48

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील मेंढोली येथील दुकानदार मनोहरराव धोंडबाजी ताजने यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. नागपूर येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होतो. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मंदाताई, पाच मुली, जावई आणि बराचसा आप्त परिवार आहे. ते मेंढोली ग्राम विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान मेंढोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.