बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास

30

जितेंद्र कोठारी, वणी : शहरातील भोंगळे ले आऊट येथे बंद घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह 45 हजाराचा ऐवज लंपास केला. चोरी झाल्याची घटना बुधवार 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजता उघडकीस आली. फिर्यादी अनिता चंद्रवदन कुमरे (52) रा. जनता शाळेच्या मागे, भोंगळे ले आऊट हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार फिर्यादी महिला आपल्या कुटुंबासह 21 ऑगस्ट रोजी भावाची तब्येत पाहण्यासाठी भद्रावती येथे गेली होती. दोन दिवस भद्रावती मुक्काम करून बुधवार दुपारी 4.30 वाजता सर्वजण परत वणी आले. तेव्हा घराचे समोरील दाराचा कुलूप तुटून खाली पडून दिसला. घरात आत जाऊन पाहिले असता लोखंडी कपाटातील लॉकर तोडून दिसले. लॉकर मध्ये ठेवलेले कानातील सोन्याचे 2 वेले किंमत 20 हजार, 3 टॉप्स किंमत 11 हजार, 1 झूमका किंमत 7 हजार, नाकातील बेसर किंमत 500 तसेच जुने वापरते 3 मोबाईल व बँटेक्सचे दागिने ज्याची किंमत 6 हजार रुपये असे एकूण 44 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळले.

चोरी झाल्याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 380, 457 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन वानोळे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.