कोळसा खाणीतून तांब्याची केबल चोरणाऱ्याला अटक

27

जितेंद्र कोठारी, वणी : वेकोलिच्या नायगाव कोळसा खाणीतून तांब्याची केबल चोरीची घटनेचा शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला. पोलिसांनी हनुमान नगर येथून आरोपी अमोल हिरामण रामटेके (38) याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेली 25 फूट तांब्याची केबल किंमत 20 हजार रुपये व चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत 25 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे.

वेकोलिच्या नायगाव कोळसा खाणीत सिक्युरिटी इंचार्ज म्हणून हनुमान महादेव काकडे यांनी मंगळवार 22 ऑगस्ट रोजी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की नायगाव कोळसा खाणीतून तब्बल 25 फूट तांब्याची जाड इलेक्ट्रिक केबल ज्याची किंमत 20 हजार आहे ती कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. तक्रारीवरून शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यांनी वेगाने तपास चक्र फिरवून गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून हनुमान नगर येथून आरोपीला मुद्देमालासह अटक केली.

सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, हेड कॉन्स्टेबल सुनील दुबे, निलेश भुसे, गजानन सावसाकडे, विजय फुलके यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.