अज्ञात इसमचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

35

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वणी मुकुटबन मार्गावर मानकी शिवारात अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवार 15 आगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान  उघडकीस आली. या मार्गावरून ये जा करणाऱ्या काही नागरिकांना उग्र वास आल्यामुळे त्यांनी नाल्याच्या बाजूला डोकावून पहिले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजित जाधव घटनास्थळी पोहचले.

मृतदेह तब्बल 3 ते 4 दिवसपूर्वीचा असून त्याचे हात, पाय व चेहऱ्याला जंगली जनावरांनी कुतरून क्षतविक्षत केल्याचे आढळले. अंदाजे 40 वर्ष वय असलेल्या मृत इसमाच्या अंगावर भुऱ्या रंगाची पेंट घालून आहे. पोलिसानी मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. सदर इसमाचा मृत्यू कशामुळे झाला तसेच सदर व्यक्ति कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. वणी पोलीस स्टेशन हद्दीतील कोणी व्यक्ति बेपत्ता असल्यास वणी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदार अजित जाधव यांनी केले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.