राजूर येथे डोळ्यांची साथ रोग निदान शिबिराचे आयोजन

19

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालक्यातील राजूर येथे डोळ्यांची साथ रोग निदान शिबिर पार पडले. शिवसेना (उबाठा) तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर होते. सहसंपर्क प्रमुख संतोष माहूरे, विजय पनगंटीवार सदस्य खरेदी विक्री संघ झरी, बालाजी मिलमीले, मो अस्लम, भगवान मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराला रुग्णांची तपासणी शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ. स्वप्निल गोहोकर यांनी केली. शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अमृत फुलझेले युवासेना शहर प्रमुख, अभिजीत सुरशे उपशहर प्रमुख, प्रणीता असलम शेख माजी सरपंच, दिशा फुलझेले ग्रा. पं. सदस्य, प्रेमा धानोरकर माजी सरपंच भांदेवाडा, सतीश तेवर, सय्यद मोसीम, अनुराग सिंग, अमित सिंग, जय चौहान, फैजल बशीर खान, सुशिल आडकिने इ. यांनी परिश्रम घेतले. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.