अल्पवयीन मुलीची छेड काढणारा गजाआड

36

विवेक तोटेवार, वणी: घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मोबाईल दाखविण्याचे आमिष दाखवून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नासिर शेख मो. शेख (25) हा वणीतील रहिवासी आहे. त्याने एका 10 वर्षीय मुलीला मोबाईल दाखविण्याचे आमिष दाखवत तिला घरी बोलवले व तिचा विनयभंग केला. त्याच दिवशी पीडितेने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. पीडितेच्या आईने आपल्या निकटवर्तीय व शेजाऱ्यांना याबाबत सांगितले. मात्र आरोपी काही दिवस घरी नसल्याने पीडितेच्या आईने याबाबत तक्रार दिली नाही. त्यानंतर आरोपी येताच त्याच्याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात भादंविच्या 354 (अ) व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.